Type Here to Get Search Results !

नवराष्ट्र मराठी न्यूज

पेट्रोल पंपासमोरच ब्लॅकमध्ये पेट्रोलची बॉटमध्ये सर्रास विक्री,प्रशासनाचे दुर्लक्ष,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net





तालुका प्रतिनिधी- गणेश चव्हाण,

सिंदखेडराजा : सिंदखेडाराजा तालूक्यातील बीबी ते मलकापूर पांगरा रोडवरील पेट्रोल पंपा समोर सर्रास ब्लॅक पेट्रोल विक्री सुरु आहे.




 बीबी मलकापूर रोडवर हिंदुस्थान पेट्रोलियम (HP)चा पेट्रोल पंप चालू आहे. त्याच पंपासमोर समोर अनाधिकृतपणे सर्रास बिसलेरी बॉटलमध्ये पेट्रोल विक्री चालू आहे.लांबून येणाऱ्या लोकांना १६० रुपये लिटर प्रमाणे पेट्रोल दिले जाते. यामुळे दुचाकी स्वारांचे खूप हाल होत आहे.लग्न सराईचे सीजन चालू असून लोक लांब लांबून वेगवेगळ्या गावी येत जात असतात त्यामध्ये उन्हाचा पारा चढलेला असतो म्हणजेच ४० अंशापार राहते आणि पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही असे सांगितले जात असल्यामुळे किंवा नसल्यामुळे नाईलाजाने बाहेरून पेट्रोल खरेदी करावी लागत आहे.याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.अशी ग्राहकांची मागणी आहे.



हाच तो HP चा पेट्रोल पम्प समोरच होते बॉटलमध्ये अवैध विक्री,


Post a Comment

0 Comments

Top Post Ad