आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक :
सांगली : जिल्ह्यातील चोरीच्या घटनांनी आता अक्षरशः कळस गाठला आहे. सोने-चांदीचे दागिने, शेतातील मोटारी आणि इतर वस्तूंच्या चोरीनंतर आता चोरट्यांनी थेट मोबाइल टॉवरच चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिरज तालुक्यातील आरग गावात तब्बल २० लाख रुपयांचा, १२५ फूट उंच मोबाइल टॉवर गायब झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
“मिरज तालुक्यातील आरग गाव… आणि चोरट्यांनी केलेला असा कारनामा ज्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. आरग ते विशाल ढाबा रोडलगत उभारण्यात आलेला तब्बल १२५ फूट उंच मोबाइल टॉवरच अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.” “सुमित डिजिटल इन्फ्राचे अधिकारी विशाल प्रभाकर चव्हाण यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. देवदास माने यांच्या शेतजमिनीमध्ये उभारण्यात आलेल्या या टॉवरचा करार संपल्यानंतर काम बंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरांनी टॉवरच लामपास केले आहे.

Post a Comment
0 Comments