Type Here to Get Search Results !

तराडखेड फाट्याजवळ डिझल ट्रँकर पलटी,माजलगाव तालुक्यात मोठी घटना,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net




मुख्यसंपादक -

बीड : माजलगाव तालुक्यातील तालखेड फाट्या जवळ आज सकाळी डिझेलने भरलेला टँकर अचानक पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणात डिझेल रस्त्यावर सांडले.




घटनेची माहिती मिळताच आसपासच्या गावांतील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. सांडलेले डिझेल घेण्यासाठी नागरिकांनी अक्षरशः झुंबड उडवली होती. कोणी बादल्या, कोणी कॅन, तर कोणी भांडी घेऊन डिझेल भरण्यासाठी धाव घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. काहींनी दुचाकींच्या कॅनमध्येही डिझेल भरून नेण्याचा प्रयत्न केला.


दरम्यान, टँकर पलटी झाल्यानंतर परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. 


घटनेची माहिती मिळताच पोलिस व संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, टँकर कसा पलटी झाला याबाबत अधिक तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad