Type Here to Get Search Results !

महिला आपल्या लहान मुलासह बेपत्ता; धाड पोलिसांकडे मिसिंग दाखल,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net


जिल्हा प्रतिनिधी - समाधान राठोड,

बुलढाणा : जिल्ह्यातील धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चांडोळ येथील विवाहित महिला व तिचा दोन वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी धाड पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग क्रमांक ०४/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन सुनिल देशमुख (वय ३६, रा. चांडोळ ता. जि. बुलडाणा) यांनी २३ एप्रिल २०२६ रोजी धाड पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून तक्रार दिली. त्यांची पत्नी सौ. वैशाली सचिन देशमुख (वय २४) या १८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यानंतर पांग्री येथील नातेवाईकांकडे ठेवलेले सामान आणण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा श्री सचिन देशमुख (वय २ वर्ष) हाही होता.


संध्याकाळपर्यंत त्या घरी परत न आल्याने नातेवाईक व परिसरात शोध घेण्यात आला. मात्र, दोघांचाही ठावठिकाणा लागला नसल्याने अखेर धाड पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची नोंद करण्यात आली.


हरविलेल्या महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे : उंची अंदाजे ५.५ फूट, रंग गोरा, केस काळे व वाढलेले.


या महिला व बालक कुठे आढळल्यास किंवा काही माहिती मिळाल्यास धाड पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आव्हान     पो लिसांनी केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चौकशी अधिकारी शांताराम जाधव, सहायक फौजदार, पोलीस स्टेशन धाड हे करीत आहेत.





Post a Comment

0 Comments

Top Post Ad