Type Here to Get Search Results !

ब्लॅकमेल करून सख्या मावशीवर बलात्कार, नात्याला काळिमा फासणारी भयानक घटना, महिलेच्या संसारावर फेरलं पाणी.

आंतरराष्ट्रीय,

राष्ट्रीय,

महाराष्ट्र,

राजकीय,

खेळ,

क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


मुख्यसंपादक -


महिलेचा संसार उध्वस्त.

 उ. प्र.- बरेली जिल्ह्यातील सीबीगंज परिसरातून नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने सख्ख्या मावशीचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करत, तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. यानंतर महिलेचा संसार मोडल्याचे देखील उघडकीस आले आहे. या घटनेने कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.


आरोपी पीडित महिलेचा भाचा.गुंगीच औषधं देऊन केला बलात्कार.

पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी हा तिचा भाचा असून तो नेहमी तिच्या घरी येत-जात असे. या ओळखीचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने सुमारे दोन वर्षांपूर्वी मावशीचे अंघोळ करतानाचे अश्लील व्हिडिओ गुपचूप तयार केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर दबाव टाकला.आरोपीने एकेदिवशी पीडित महिलेच्या शीतपेयात गुंगीचे औषध मिसळून तिला ते पिण्यास भाग पाडले. ती बेशुद्ध झाल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप आहे. इतकेच नव्हे, तर या घटनेदरम्यान त्याने तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओही तयार केले आणि त्यांचा वापर करून तिला सतत ब्लॅकमेल करत राहिला. व्हिडिओ व्हायरल होईल या भीतीमुळे पीडिता बराच काळ गप्प राहिली आणि मानसिक त्रास सहन करत राहिली.



बदनामी झाली आणि पीडितेचे लग्न मोडले.

दरम्यान, पीडितेचे लग्न फरिदपूर येथे ठरले होते. १३ जून रोजी विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र, आरोपीने फरिदपूर येथे जाऊन आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ दाखवत लग्न मोडल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे पीडिता आणि तिच्या कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. पीडितेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, या प्रकारामुळे केवळ पीडितेची बदनामीच झाली नाही, तर तिचे वैवाहिक आयुष्य सुरू होण्याआधीच उद्ध्वस्त झाले आहे.या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. डिजिटल पुरावे गोळा करण्यात येत असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad