Type Here to Get Search Results !

बच्चू कडूंचं ठरलं, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार..

आंतरराष्ट्रीय,

राष्ट्रीय,

महाराष्ट्र,

राजकीय,

खेळ,

क्राईम,

नवराष्ट्र मराठी न्यूज,

मुख्यसंपादक -

मुंबई,

 मी शिवसेनेत येतोय...; बच्चू कडूंचं ठरलं, शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश.

राजकारणात मला मंत्रीपदाचं काही नाही, मला काही मागायची सवय नाही, मला मंत्रीपद हवं असतं तर मागे गुवाहाटीला गेलो होते, तेव्हाच मागितलं असतं ना, आम्ही दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत बसलो आहे, लोक मंत्रीपदासाठी फिंल्डींग लावत होती, पण मी दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत होतो, हाच फरक आहे, बच्चू कडूचा हे समजून घ्या, असंही कडूंनी म्हटलंय. आता जे घडतंय ते माझ्या ध्यानीमनी देखील नव्हतं, मला काहीच माहिती नव्हती, मी संत्र्याला पाणी देत होतो, तुमच्या बातम्या आल्या सुत्रांनी सांगितलं फोन केला हे केलं, इथंपर्यंत मी येण्याचं श्रेय हे मी माध्यमांना देतो, विधान परिषद माझ्या कानावर देखील नव्हती, हे कानावर टाकण्याचं काम माध्यमांनी केलं असंही बच्चू कडूंनी म्हटलं आहे.


महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी उलथापालथ.

राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि आक्रमक नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली होती. मात्र आज बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, मी शेतकरी, मजूर, दिव्यांगासाठी धनुष्यबाण हाती घेणार आहे. काल परवा ज्या चर्चा झाल्या, त्या सर्व शिवसेनेनं मान्य केल्या आहेत.बच्चू कडूचं काम प्रामाणिकपणे राहिल, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे. 

मायबाप जनतेच्या भल्यासाठी विलीन होतोय.

हमीभावामध्ये ज्या सुधारणा हव्या आहते.पेरणी ते कापणीपर्यंत सगळे काम एमआरजेएसमध्ये घ्यावं, त्यांच्यासाठी लढण्याची गरज आहे. लाडकृ्या बहिणीमधील विधवा बहिणी तशाच कोरड्या आहेत. दिव्यांगांच मंत्रालय साहेबांनी स्थापित केलं शिंदेंनी त्याचं बळकटीकरण झालं नाही,हे सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतर हा निर्णय घेतो आहे, बच्चू कडूचं काम प्रामणिक राहिलं, शिवसेनेची राजकीय ताकद मजबुत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, त्याच्या बदल्यात मला हवी आहे, शेतकऱ्यांची ताकद, दिव्यांगांची ताकद, त्याच्या बदल्यात कोणताही समझोता होणार नाही,एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वामध्ये दिव्यांग मंत्रालय जर उभं राहत असेल तर त्याच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न झाला पाहिजे. 


दोन्ही संघटना कायम राहणार.

शेतकऱ्याच्या लढाईमध्ये एक इंचही फरक पडणार नाही. प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना कायम राहणार मात्र पूर्ण ताकदीने शिवसेना कशी वाढेल, यासाठी जसा माझ्या शरीरातील रक्तांचा प्रत्येक थेंब शिवसेनेसाठी धवाणार आहे तसाच माझ्या शेतकऱ्यांसाठी देखील धावणार आहे, कारण समझोता शेतकरी, मजूर, दिव्यांगासाठी होऊच शकत नाही. राजकीय प्रवास आम्ही शिवसेनेतून केला होता. माझ्याजवळ अजूनही पत्र आहे बाळासाहेब ठाकरेंना लिहलेलं पत्र की कर्जमाफी करावी, आणि काही मुद्दे होते, आम्ही तेव्हा कापसाच्या भावासंदर्भात आम्ही राजीनामा दिला होता, त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आणि दिव्यांगाच्या मुद्द्यावर शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन, तो माझ्या शेतकरी, मजूर यांच्यासाठी मी लढणार आहे, असंही पुढे बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे.


सामाजिक कामासाठी प्रहार राहिलच.


.

मागील काही तासात शिंदेंसोबत शेतकऱ्यांच्या हमीभावावर चर्चा झाली, पेरणीपासून ते कापणीपर्यंची चर्चा झाली, दिव्यांगाच्या, आदिवासींच्या संदर्भात चर्चा झाली, त्यांनी सहमती दर्शवली, ज्यासाठी आम्ही मंत्री होतो, आमदार होतो, ज्यासाठी आम्ही आहे, तो होत असेल तर काय असंही पुढे कडू म्हणाले, संघटना या काळात चालवणं फार कठिण आहे, माझं काम आहे कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करणं, जन्म शिवसेनेचा आणि शेवटही शिवसेनेत व्हावा असंही कडू पुढे म्हणाले. प्रहार संघटना राहिलं, ज्याला सामाजिक काम करायचं आहे, त्यासाठी प्रहार राहिलं, असंही कडू पुढे म्हणालेत.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad