Type Here to Get Search Results !

मारहाणीच्या घटनेनंतर पोलीस आयुक्तांचे आदेश,वसुली एजंटावर करडी नजर,

आंतरराष्ट्रीय,

राष्ट्रीय,

महाराष्ट्र,

राजकीय,

खेळ,

क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,

मुख्यसंपादक:

पुण्यात वसुली एजंटांवर आता लगाम लागणार! मारहाणीच्या घटनेनंतर पोलीस आयुक्तांनी दिले महत्वाचे आदेश.


 

पुणे : सोलापूर रोडवरील पंधरा नंबर चौकात क्रेडिट कार्ड थकबाकी वसुलीच्या वादातून एका नागरिकाला भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना समोर आल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या हद्दीतील बँका आणि संबंधित संस्थांशी समन्वय साधून रिकव्हरी एजंटांची सविस्तर माहिती गोळा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


घटनेचा व्हिडिओ झाला होता वायरल.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली. संबंधित प्रकरणात वसुली एजंटांकडून नागरिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे दिसून आले. या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन येथे तिघांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले की, शहरात कार्यरत असलेल्या सर्व रिकव्हरी एजंटांची माहिती तपासली जाणार असून त्यांची चरित्र पडताळणी बंधनकारक करण्यात येईल. तसेच, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना वसुलीच्या कामात सहभागी करून घेऊ नये, अशा सूचना बँका व संबंधित संस्थांना दिले आहे.


Post a Comment

0 Comments