आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
महाराष्ट्रातील शेतकरी आधीच आर्थिक संकटात; त्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप पिकांवर संकट,
मुख्यसंपादक :
बुलढाणा: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा मिळावा, यासाठी जाहीर करण्यात आलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्ष लाभ मिळवताना शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी खरंच दिलासा आहे की केवळ कागदावरील घोषणा? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
आधार प्रमाणीकरण, पात्रता, लाभार्थी यादी आणि कर्ज खात्याशी संबंधित प्रक्रियेमुळे अनेक शेतकरी संभ्रमात आहेत. वर्षानुवर्षे कर्ज फेडण्यासाठी संघर्ष करणाऱ्या बळीराजाला तातडीच्या मदतीची गरज असताना, कर्जमाफीच्या प्रक्रियेतच अडथळे निर्माण होत असतील तर योजनेचा नेमका फायदा कोणाला होणार, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
त्यातच पावसाने फिरवली पाठ!
एकीकडे कर्जाचा डोंगर आणि दुसरीकडे पावसाची अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. खरीप हंगामातील पिकांना पाण्याची गरज असताना अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने पिके धोक्यात आली आहेत. कर्जमाफीची प्रतीक्षा आणि पिकांच्या नुकसानीची चिंता, अशा दुहेरी संकटात बळीराजा सापडला आहे.
सरकारने केवळ कर्जमाफीची घोषणा न करता पात्र प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्यक्ष आणि तातडीने कर्जमुक्तीचा लाभ द्यावा, तसेच पावसाअभावी नुकसान झालेल्या भागांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
घोषणा झाली, यादी आली; पण शेतकऱ्यांच्या कर्जाच्या ओझ्यात खरोखर किती घट झाली? याचे स्पष्ट उत्तर सरकारने देणे गरजेचे आहे.
बळीराजाला आश्वासन नको, आता प्रत्यक्ष दिलासा हवा!


Post a Comment
0 Comments