राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
बुलढाणा | प्रतिनिधी,
ऋषिपंचमीच्या पावन पर्वावर बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. राजेंद्रजी शिंगणे व उपाध्यक्ष श्री. गोविंदरावजी मिरगे यांचा पदग्रहण सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
सोहळ्याची सुरुवात संत गजानन महाराजांच्या आरतीने करण्यात आली. आरतीनंतर डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांनी अध्यक्षपदाचा, तर श्री. गोविंदरावजी मिरगे यांनी उपाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी बँकेच्या विविध विभागांची पाहणी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी नवनिर्वाचित संचालक श्री. जालिंदर बुधवत यांनी संत गजानन महाराजांची आरती करून नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांना पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
शेतकरी, सभासद आणि ठेवीदारांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत बँकेला अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रगतिशील बनविण्याच्या दिशेने नव्या नेतृत्वाने कामकाजाला सुरुवात केली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेच्या आगामी वाटचालीकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
सहकाराच्या नव्या पर्वाची सुरुवात!
भक्ती, विश्वास आणि सहकाराची सांगड घालत नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांनी पदभार स्वीकारल्याने बँकेच्या पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
नवराष्ट्र मराठी न्यूज
संपादक : देविदास वायाळ पाटील


Post a Comment
0 Comments