आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
बुलडाणा: जिल्हा केंद्रीय सहकारी बँक ची निवडणूक काहीच दिवसापूर्वी पार पाडली होती.आणि संचालक मंडळही निवडलेले होते. परंतु अध्यक्षपदी कोण बाजी मारणार हा सस्पेन्स कायम होता. मात्र सस्पेन्स संपला व माननीय डॉ. राजेंद्रजी शिंगणे साहेब अध्यक्षपदी विराजमान व उपाध्यक्षपदी माननीय श्री गोविंदरावजी मिरगे यांची निवड करण्यात आली.
बुलढाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अनुभवी नेते आणि एकमेव धडाडीचे नेतृत्व म्हणून मा. डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेबांना ओळखले जाते. अनेक वर्षे सहकार चळवळीत सक्रिय असलेल्या डॉ. शिंगणे यांच्या अविरोध निवडीमुळे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण होतेच आणि आता अध्यक्षपदी निवड झाल्याने चाहता वर्ग खूप आनंदी आहे. विविध सहकारी संस्था, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून जिल्हा बँकेच्या आगामी संचालक मंडळात त्यांच्या अध्यक्ष पदाच्या भूमिकेकडे विशेष लक्ष लागले आहे.


Post a Comment
0 Comments