आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
माजलगाव : सावकारकीचा नवीन परवाना देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून, तडजोडीअंती १३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना माजलगाव येथील सहायक निबंधक, कार्यालयीन अधीक्षक आणि एका खाजगी इसमास जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी रंगेहात पकडले.
येथील सहायक निबंधक कार्यालयात कार्यरत असलेले सहायक निबंधक सूरज जगदाळे, कार्यालयीन अधीक्षक सतीश शेरखाने आणि एक खाजगी इसम यांनी तक्रारदाराकडे सावकारकीचा परवाना देण्यासाठी सतीश शेरखाने,सूरज जगदाळे ठाण मांडून बसलेला शेरखाने 'गब्बर' माजलगाव सहायक निबंधक कार्यालयातील कार्यालयीन अधीक्षक सतीश शेरखाने हा गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून याच ठिकाणी कार्यरत आहे. मध्यंतरीच्या काळात त्याची बदली झाली होती. मात्र, त्याने राजकीय फिल्डिंग लावून आपली बदली पुन्हा माजलगाव येथेच करून अनेक वर्षांपासून एकाच जागेवर ठाण मांडून असल्यामुळे कार्यालयातील सर्व नाड्या आणि व्यवहार शेरखाने याच्याच हातात होते. याच जोरावर तो चांगलाच गब्बर झाला होता. मात्र, अखेर तो एसीबीच्या जाळ्यात अडकला.२५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. काढून सुरुवातीला २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामध्ये तडजोड करून घेतली होती.१३ हजार रुपये देण्याचे ठरले. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सहायक निबंधक कार्यालयातच ही १३ हजार रुपयांची लाच घेताना दबा धरून बसलेल्या जालना एसीबीच्या पथकाने तिघांनाही रंगेहात ताब्यात घेतले. जालना एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांनी कारवाई केली.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून जालना येथील एसीबीच्या पथकाने बीड जिल्ह्यात प्रचंड कारवाया करून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे बीडच्या पथकावर एकप्रकारे संशय व्यक्त केला जात आहे.

Post a Comment
0 Comments