आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
जिल्हा प्रीतिनिधी : समाधान राठोड,
घरकुल संबंधित निधी लाटला,
बुलढाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय कुंभेफळहे गाव सिंदखेडराजा पंचायत समिती अंतर्गत येत असून शासनाकडून चालू आर्थिक वर्षात लाभार्थ्यांना इदिरागांधी आवास, रमाई घरकुल, मोदी आवास, इ. घरकुल देण्यात आली होती कुंभेफळ गावामध्ये कोणत्याही प्रकारची घरे न बांधता, अर्धवट बांधकाम करता बिले काढली.ग्रामपंचायत व काही अधिकाऱ्यांनी मिळून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे.
काही लोकांची घरे पूर्ण झाली असून त्यांची अजून बिले निघाली नाही तर त्यांच्या नावावरती काही देवाण-घेवाण करून दुसऱ्यांची बिले काढण्यात आली यामुळे गावकऱ्यांमध्ये खूप रोष निर्माण झाला आहे. प्रशासनाने चौकशी करून ग्रामपंचायत अधिकारी इंजिनियर किंवा कोणी दोषी ठरेल त्यांची योग्य ती चौकशी करून अधिकारी बडतर्फीची शिक्षा दिली पाहिजे. कारण शासनाच्या नियमाचे सर्रास उल्लंघन हे अधिकारी मंडळी करत आहे.

Post a Comment
0 Comments