Type Here to Get Search Results !

पुण्याच्या तरुणीचा बोगस कारनामा उघड, बनावट "अपंग"प्रमाणपत्राने लाटली सरकारी नोकरी, पालघर पोलिसांकडून अटक,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक :

पालघर: पालघर जिल्ह्यात बनावट अपंग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पालघर पोलिसांनी पुण्यातील एका तरुणीला अटक केली असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




न्यायालयाने सुरुवातीला तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषदेने तिची सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील रुपाली टेंगळे हिने 'प्रयोगशाळा तंत्रज्ञ' या पदासाठी अपंग प्रवर्गातून अर्ज केला होता. या अर्जासाठी तिने धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे श्रवणदोष असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. या प्रमाणपत्राच्या आधारे तिची निवड झाली आणि तिला पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती देण्यात आली होती.



सुरुवातीला संबंधित प्रमाणपत्र वैध असल्याचे कळवण्यात आले होते. मात्र राज्यात बोगस अपंग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय लाभ आणि नोकऱ्या मिळवणाऱ्यांवर कारवाई सुरू झाल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. त्यानुसार विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अपंग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली.


तपासादरम्यान रुपाली टेंगळे हिने सादर केलेल्या प्रमाणपत्राची अधिकृत नोंद उपलब्ध नसल्याचे समोर आले. यानंतर हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जिल्हा परिषदेने तातडीने तिची सेवा समाप्त केली. तसेच संबंधित तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


पालघर पोलिसांनी कारवाई करत रुपाली टेंगळे हिला अटक केली. न्यायालयाने सुरुवातीला पोलीस कोठडी दिल्यानंतर आता तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे शासकीय नोकऱ्यांमध्ये बनावट कागदपत्रांच्या वापराबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad