आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठीन्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक -
हिंगोली :कळमनुरी येथील पोलीस अधिकारी डॉ. नीलाभ रोहन हे कर्तव्य कठोर व कडक शिस्तीचे पोलीस अधीक्षक म्हणून ओळखले जातात त्यांनी हिंगोली जिल्हा पोलीस घटकातील प्रत्येक गोष्टीवर बारकाईने नियंत्रण ठेवून नागरिकांना जास्तीत जास्त चांगली सुविधा मिळवून देण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. वेळ प्रसंगी कर्तव्यात कसूर करणाऱ्यां पोलिसांवर कठोर कार्यवाही केली आहे.
महाराष्ट्र पोलीस तर्फे नागरिकांना पोलिसांची तात्काळ मदत मिळण्यासाठी डायल 112 ही सुविधा उपलब्ध करून दिली असून त्यावर पीडित व्यक्तीचा कॉल आल्यानंतर तात्काळ पोलीस मदत पाठवली जाते. तसेच कॉल आल्यानंतर कमीत कमी वेळात पोलीस मदत देते पोहोचली पाहिजे यावर पोलीस अधीक्षक यांचे बारकाईने लक्ष असते.
दिनांक 12 मे 2026 रोजी पोलीस स्टेशन कळमनुरी हद्दीत रात्री आठ वाजण्याची सुमारास डायल वन वन टू वर पोलीस मदतीसाठी कॉल आला असता कर्तव्यावरील पोलीस अंमलदार 639/ किशोर शंकर राठोड नेमणूक पोलीस स्टेशन कळमनुरी हे अगदी मर्यादित वेळेमध्ये सदर कॉल ला प्रतिसाद देऊन पीडित व्यक्तीच्या मदतीसाठी जाणे अपेक्षित असताना त्यांनी तब्बल दीड तास उशीर केल्याने सदरची बाब मा. पोलीस अधीक्षक सरांच्या लक्षात आली. त्यावरून डॉ.नीलाभ रोहन यांनी डायल 112 कर्तव्यावरील पोलीस अंमलदार किशोर शंकर राठोड यांना त्वरित निलंबित केले आहे.

Post a Comment
0 Comments