Type Here to Get Search Results !

अजित पवार यांच्या अपघातनंतर आणखी एक मोठी विमान दुर्घटना; खाजगी विमान 30 फूट उंचीवरुन खाली कोसळले

 आंतरराष्ट्रीय,


महाराष्ट्र,


क्राईम,


मुख्यसंपादक - देविदास वायाळ पाटील


मो. 9834285153


Chhattisgarh Breaking : अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर आणखी एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. खाजगी विमान 30 फूट उंचीवरुन खाली कोसळले आहे. छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात ही विमान दुर्घटना घडली. पायलट आणि को पायलट यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. डोंगराळ भागात हे विमान कोसळले आहे. यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

जशपूर जिल्ह्याील नारायणपूर परिसरात ही विमान दुर्घटना घडली. विमान डोंगराळ भागात कोसळले. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार जशपूरच्या नारायणपूर भागातील रतनपहळी जंगलात चार्टर्ड विमान झाडांना धडकले. अपघातानंतर डोंगरात आगीच्या ज्वाला आणि धूर निघताना दिसला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय पथके घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरू केले. विमानात किती लोक होते हे अद्याप समजू शकलेले नाही. विमान 30 फूट उंचीवर उडत होते.


धुराचे लोट

जशपूर जिल्ह्यामध्ये ही घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. हे एक खासगी विमान आहे. या विमानात किती लोक प्रवास करत होते, याची माहिती अद्याप समोर आली नाही. एक चार्टर्ड विमानन असल्याची माहिती समोर येत आहे. हे विमान जशपूर जिल्ह्यातील नारायणपूर भागात असलेल्या रतनपहलीच्या जंगलामध्ये डोंगराला धडकलं असल्याचं सांगितलं जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस रवाना झाले आहे.

Post a Comment

0 Comments