आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
बुलढाणा, दि. १९ : ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकांची उपस्थिती अधिक पारदर्शक करण्यासाठी आता GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीद्वारे हजेरी नोंदविण्याच्या कार्यवाहीला वेग देण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिले आहेत.
मुख्याधिकऱ्यांना धडकले पत्र,
ग्रामविकास विभागाच्या कार्यासन अधिकाऱ्यांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठविले आहे. या पत्रात ग्रामपंचायत अधिकारी (पूर्वीचे ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी) यांची GPS व बायोमेट्रिक हजेरी प्रणाली राबविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
बायोमेट्रिक प्रणालीद्वारे हजेरी,
कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी विशेष म्हणजे, संबंधित कार्यवाहीबाबत तक्रारी प्राप्त होत असल्याचे शासनाच्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची GPS आणि बायोमेट्रिक प्रणालीच्या माध्यमातून हजेरी घेण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना पुन्हा एकदा देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर अधिक प्रभावीपणे देखरेख ठेवण्यास मदत होणार असून, ग्रामपंचायत प्रशासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्याची अपेक्षा आहे.
कारवाईकडे ग्रामस्तांचे लक्ष,
ग्रामविकास विभागाचे कार्यासन अधिकारी नितीन स. पवार यांच्या स्वाक्षरीने हे पत्र जारी करण्यात आले आहे. पत्राच्या प्रती अपर आयुक्त (आस्था), सर्व विभागीय आयुक्त कार्यालय तसेच संबंधित निवडणूक शाखेला पाठविण्यात आल्या आहेत. GPS-बायोमेट्रिक हजेरीची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत होते आणि अनुपस्थितीच्या प्रकरणांवर काय कारवाई होते, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment
0 Comments