Type Here to Get Search Results !

नशिराबाद ग्रामपंचायत कारभारावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; चौकशी करून कारवाई करावी - तक्रारदार रोहिदास राठोड,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


जिल्हा प्रतिनिधी: समाधान राठोड,

बुलढाणा: जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील नशिराबाद ग्रामपंचायतीमध्ये विविध विकास कामांत आणि घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक रोहिदास गणपत राठोड यांनी केला आहे.




याबाबत त्यांनी पंचायत समिती सिंदखेडराजा चे गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच भ्रष्टाचारविरोधात आवाज उठवल्यामुळे जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याचा धक्कादायक दावाही त्यांनी केला आहे.


तक्रार अर्जातील मुख्य मुद्दे व आरोप,

१. बेकायदेशीर पाणी पुरवठा व पाईपलाईन कामे -

नशिराबाद ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सावरगाव माळ भागातील मतदानाचा आधार घेऊन विकासकामे दाखवली जात आहेत. नशिराबादपासून सुमारे २ किमी अंतरावर सावरगाव माळ शिवारात बंजारा वस्ती खादानाच्या बाजूला आहे. या वस्तीचा नशिराबाद ग्रामपंचायतीशी संबंध नसतानाही, तेथे बेकायदेशीरपणे पाणी पुरवठा पाईपलाईन, नळ योजना व तांडावस्तीची कामे नशिराबाद ग्रामपंचायतीच्या निधीतून करण्यात आल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे.


२. घरकुल योजनेतील अनियमितता व मानधन वाटप -

घरकुल योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी घरकुले बांधली आहेत, त्यांना हक्काचे घरकुलाचे पैसे देण्यास टाळाटाळ व त्रास दिला जात आहे. याउलट, ज्यांनी प्रत्यक्षात घरकुले बांधलेलीच नाहीत, त्यांना कोणतीही शहानिशा किंवा चौकशी न करता पूर्ण घरकुल हप्ते वितरित करण्यात आल्याचा गंभीर आरोप रोहिदास राठोड यांनी केला आहे.

३. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीची चौकशी - 

ग्रामपंचायतीमधील मागील ३ वर्षांच्या १५ व्या वित्त आयोगाच्या जमा-खर्चाची सखोल चौकशी करून, त्याचा पुरावा उघड करावा आणि सत्यप्रत गट विकास अधिकाऱ्यांनी आगामी ग्रामसभेत सादर करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.


तक्रार का केली? रोहिदास गणपत राठोड यांना जीवे मारण्याची धमकी,

गावातील भ्रष्टाचाराविरोधात चौकशीची मागणी केली असता, संबंधित यंत्रणा व सरपंचांकडून दाबदबाव आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा रोहिदास गणपत राठोड यांनी केला आहे.

• निधीचा गैरवापर,

नशिराबादच्या विकासासाठी आलेला निधी मूळ गावाऐवजी इतरत्र व अतिरिक्त भागात वापरून गैरव्यवहार केल्याचा आरोप.तक्रार अर्जदार यांनी केला.त्यांनी तक्रार अर्जाच्या प्रती जिल्हाधिकारी, बुलढाणा,पाणी पुरवठा अधिकारी, बुलढाणा, घरकुल योजना अधिकारी, बुलढाणा व गट विकास अधिकारी, सिंदखेडराजा यांना सादर केल्या आहेत.


  सर्व ग्रामस्थांना एकत्र येऊन भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्याचे आव्हान रोहिदास राठोड यांनी केले.आणि आता या प्रकरणात पंचायत समिती व प्रशासकीय अधिकारी कोणती पावले उचलतात आणि दोषींवर काय कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






Post a Comment

0 Comments

Top Post Ad