Type Here to Get Search Results !

पावसाची पुन्हा जोरदार एन्ट्री; विदर्भात आभाळ गडगडणार,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :


राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने विदर्भासह महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा अंदाज वर्तवला असून, २३ आणि २४ ऑगस्ट रोजी विदर्भातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.उत्तर-पूर्व मध्य प्रदेश आणि लगतच्या भागात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. काही भागांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, सखल भागांत पाणी साचण्याचा धोका आहे.




कोकण आणि गोव्यात २० ते २६ ऑगस्टदरम्यान बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम, तर काही भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही २६ ऑगस्टपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.दरम्यान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, बिहार, ओडिशा, झारखंड आणि ईशान्येकडील राज्यांनाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

#VidarbhaRain #VidarbhaWeather #MaharashtraRain #MaharashtraWeather #HeavyRain #RainAlert

Post a Comment

0 Comments

Top Post Ad