Type Here to Get Search Results !

काल खवड्या डोंगरावरून पडून कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता, कुणालच्या आजोबाचा अत्यंत खळबजनक खुलासा,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

संभाजीनगर: खवड्या डोंगरावरून दरीत कोसळून संपूर्ण कुटुंब संपल्याच्या हृदयद्रावक घटनेत आता मृत मुरलीधर चांदगुडे यांचे वडील म्हणजेच कुणालचे आजोबा दामोदरराव चांदगुडे यांनी अत्यंत भावुक आणि धक्कादायक खुलासे केले आहेत. 




"मुरलीधरने २० वर्षांपूर्वी आम्हाला न सांगता परस्पर लग्न केले होते. मुलींना बाजूला ठेवून मी माझी सर्व ३ एकर शेती त्याच्या नावावर केली, पण तो कधी गावी आलाच नाही," असे सांगताना वृद्ध वडिलांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. 


चांदगुडे कुटुंबात गेल्या सहा वर्षांपासून सतत वाद सुरू होते. सुमारे ६ वर्षांपूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचे आजारपणामुळे निधन झाले होते, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब मानसिक धक्क्यात गेले होते. मुरलीधर ट्रकचालक असल्याने सतत घराबाहेर असायचे आणि कुणालचे वडिलांशी अजिबात जमत नव्हते. 


मुरलीधर नोकरीच्या शोधात छत्रपती संभाजीनगरला गेले होते. तिथे ड्रायव्हर म्हणून काम करत असताना त्यांनी संगीता यांच्याशी विवाह केला. या लग्नाची माहिती त्यांनी गावी दिली नव्हती. त्यामुळे कुटुंबीय सुरुवातीला नाराज होते.  


वडिलांनी सांगितले, "मुरलीधर कमी बोलायचा, तरीही मी मुलींना एक तुकडा न देता माझी सर्व ३ एकर शेती त्याच्या नावावर केली. पण तो शेती करायला कधी गावी आलाच नाही, त्याने ती जमीन बटाईने दिली होती." 


मुरलीधरच्या बहिणाचा आरोप,

मुरलीधर आणि त्यांची पत्नी संगीता यांचं याच कलहातून गावाकडे येणं-जाणं कमी झालं होतं. दरम्यान बहीण आणि आई वडिलांसोबत बोलत असल्यामुळे संगीता यांनी मुरलीधर यांना घरातून बाहेर काढल्याचा आरोप त्यांची बहीण शोभा म्हस्के यांनी केला आहे. दुसरीकडे, मुलाचं गावाकडे येणं कमी झाल्याने मुरलीधर आणि त्यांच्या वडिलांमध्ये संवादही कमी झाला असल्याची माहिती त्यांच्या आई-वडिलांनी दिली आहे. दरम्यान, मयत मुरलीधर चांदगुडे यांचे वडील रामभाऊ चांदगुडे यांनी आपल्या मुलाला (मुरलीधरला) पत्नी आणि त्यांच्या मुलाने घराबाहेर काढल्याचा आरोप देखील केला. मुरलीधर चांदगुडे हे मूळचे जालना जिल्ह्यातील धनगर पिंपळगाव येथील रहिवाशी होते. ते 20 वर्षापूर्वीच कामानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये राहण्यासाठी गेले होते. त्यामुळे प्रेमविवाहाला विरोध, कुटुंबातील दुरावा आणि त्यातून निर्माण झालेला गृहकलह...या पार्श्वभूमीवरच चांदगुडे कुटुंबाने हे टोकाचं पाऊल उचललं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

#khavdyadongar #sambhajinagar #crimenews

Post a Comment

0 Comments

Top Post Ad