आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
रत्नागिरी: ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय अखेर प्रत्यक्षात आला असून,आता जन्म व मृत्यू दाखले ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध होणार आहेत. सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि सभागृहात मांडलेला ठराव महत्त्वाचा ठरला आहे.
जन्म-मृत्यू दाखले मिळविण्यासाठी ग्रामस्थांना यापूर्वी पंचायत समिती कार्यालयात जावे लागत होते. यामुळे दूरवरून येणाऱ्या नागरिकांना वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा खर्च सहन करावा लागत होता. अनेक वेळा दाखले वेळेत न मिळाल्याने नागरिकांची गैरसोय होत होती, तर काहींना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या.
या समस्येची गंभीर दखल घेत स्थायी समिती तसेच सर्वसाधारण सभेत (जनरल बॉडी) जन्म-मृत्यू दाखले ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देण्याचा ठराव मांडला होता. या ठरावाला सभागृहाने मंजुरी दिल्यानंतर प्रशासनाने आवश्यक कार्यवाही पूर्ण करत संबंधित आदेश जारी केले आहेत.
या निर्णयामुळे आता प्रत्येक ग्रामपंचायतीतून नागरिकांना जन्म व मृत्यू दाखले सहज उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील हजारो नागरिकांचा वेळ वाचणार असून प्रशासनिक सेवांचा लाभ अधिक सुलभपणे मिळणार आहे.आदेश जारी होताच ग्रामीण भागातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले.
"सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, हा निर्णय ग्रामीण जनतेसाठी मोठा दिलासा ठरणार आहे," अशी भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment
0 Comments