Type Here to Get Search Results !

कर्जमाफी मधील जाचक अटीवर चर्चा करण्याचे आश्वासनानंतर अखेर रोहितदादा पवार यांनी अन्नत्याग उपोषण सोडले,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,


www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :

पंढरपूर: अखेर रोहितदादांच्या अन्नत्याग आंदोलनाला आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीला पहिले यश मिळाले असून सरकारच्या वतीने राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. गिरीश महाजन यांनी रोहितदादांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाची व शेतकऱ्यांच्या मागण्यांची सकारात्मक दखल घेतली व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आगामी अधिवेशनाच्या आधीच म्हणजे २२ जून ला मुख्यमंत्र्याच्या सोबत एक विशेष बैठक घेऊन शेतकऱ्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले.




रोहितदादांच्या नेतृत्वात गेले तीन दिवस सुरु असलेल्या या आंदोलनाने अखेर राज्यातील बळीराजाला पुन्हा एकदा आशा मिळाली आहे. आगामी बैठकीत शेतकऱ्यांच्या वतीने एक शिष्टमंडळ सरकारसमोर शेतकऱ्यांची बाजू मांडेल व शेतकऱ्यांना अपेक्षित निर्णय या बैठकीत घेण्यास भाग पाडेल, अशी खात्री आहे.


जरी सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असली तरी शेतकऱ्यांचा हा लढा इथेच संपलेला नाही, तर शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत ही आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. जोपर्यंत सरसकट कर्जमाफीचा आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांचा अंतिम जीआर निघत नाही, तोपर्यंत आमचा हा संघर्ष आणि असाच कायम राहील. अन्नदात्याला त्याचा हक्क आणि न्याय मिळवून दिल्याशिवाय रोहितदादा आणि आम्ही सर्व जण स्वस्थ बसणार नाही!अशा भावना कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.



Navrashtra Marathi News 


Post a Comment

0 Comments

Top Post Ad