Type Here to Get Search Results !

नऊ महिन्यांचा चिमुकला पाळण्यात झोपी गेला, वादळी वारा आला अन् सगळं संपल,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक -देविदास वायाळ पाटील,

सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या खलाटी गावात मन सुन्न करून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. अवकाळी पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे पाळणा उडून गेला आणि त्यातील बाळ हवेत फेकलं गेलं, ज्यात त्या बाळाचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनं संपूर्ण जत तालुका हादरून गेला आहे.




संपूर्ण गाव हदरलं,

नियती कधी कोणासोबत कसा खेळ खेळेल याचा काही नेम नाही. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या खलाटी गावात मन सुन्न करून टाकणारी धक्कादायक घटना घडली आहे. चिमुकलं बाळ पायावर उभं राहण्याआधीच त्याच्यावर नियतीनं क्रूर खेळ खेळला. नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा वादळी वाऱ्यात झोका उडाला आणि यातच त्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेनं बाळाच्या आई बापाचं नियतीने सर्वस्व हिरावून घेतलं होतं आणि पूर्ण गाव हळहळलं, या घटनेनं शेजुळ गाव हादरून गेलं आहे. 


महिन्यांचं बाळ पाळण्यात झोपलं आणि अनुचित घडलं,

घडलेल्या घटनेनुसार, सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील खलाटी गावातील शेजुळ वस्तीत आनंदा शेजुळ यांचं कुटुंब देखील राहत होतं. घरामध्ये अवघ्या 9 महिन्यांचं बाळ पाळण्यात झोपलं होतं. आई वडील कामात व्यस्त होते, याचदरम्यान अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने हजेरी लावली होती. ज्यात नऊ महिन्यांच्या बाळाचा झोका उडून गेला आणि अक्रित घडलं. 



वाऱ्याच्या येणाऱ्या वेगामुळे पाळणा उडाला आणि झोपलेलं बाळ हवेत फेकलं,

वाऱ्याच्या येणाऱ्या वेगाने घरावरील काही पत्रे उडून गेले होते. पण दुर्दैवीपणे असं घडलं की, वाऱ्याच्या येणाऱ्या वेगामुळे पाळणा उडाला आणि त्यात झोपलेले बाळ हवेत फेकलं गेलं, ज्यात ते बाळ गंभीर जखमी झालं. वाऱ्याच्या या वेगामुळे पाळणा घरापासून दूर जाऊन फेकला गेला आणि नंतर त्याचा अंत झाला. अवघ्या नऊ महिन्याच्या काळजाचा तुकडा नियतीने हिरावून नेल्याने शेजुळ कुटुंबासह गावावर दुःखाचा डोंगर कोसळला




Post a Comment

0 Comments

Top Post Ad