Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी मध्ये पुन्हा धुसफूस, संदीप क्षीरसागरआणि विजयसिंह पंडित यांच्यामध्ये संघर्ष,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक -देविदास वायाळ पाटील,

बीड : बीड जिल्ह्यात,राष्ट्रवादी मध्ये पुन्हा एक संघर्ष पाहायला मिळाला संदीप क्षीरसागर यांनी निशाणा साधत “आम्ही काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही आम्हाला शिकवू नका” असा इशारा दिला आहे.विजयसिंह पंडित यांनी बीडमधील विकास कामांबाबत घेतलेल्या बैठकीनंतर संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत नाराजी व्यक्त केली. “माझ्या मतदारसंघातील कामांबाबत होणाऱ्या बैठकीचे मला निमंत्रण दिले नाही, हा हक्कभंग ठरू शकतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.




यावेळी बोलताना क्षीरसागर यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, “बीडवर प्रेम असल्याचे दाखवले जाते, पण बीडमधील उद्योग गेवराईला नेले जात आहेत. MIDC आणि रेशीम उद्योगसुद्धा गेवराईकडे वळवले जात आहेत.”तसेच त्यांनी अजित पवार यांच्याबाबतही भाष्य केले. “अजितदादा असताना आम्ही विमानतळासाठी मांजरसुंब्याचा सर्वे करण्याची मागणी केली होती. बॅकवॉटर योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. नगरपालिका निवडणुकीत अजितदादांना दोनदा सभा घ्याव्या लागल्या. विकासकामांसाठी आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो,” असे ते म्हणाले.


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याबाबतही क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली. “अजितदादा मला शेवटच्या भेटीत आपण एकत्र येणार असल्याचे म्हणाले होते. मात्र योग्य तो निर्णय मोठे साहेब आणि त्यांचा परिवार घेतील,” असे त्यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad