आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठी न्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक :
जालना: जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील वझरसरकटे येथील अल्पभूधारक शेतकरी गोपीनाथ सरकटे हे आपल्या शेतीकामासाठी डिझेल आणण्यासाठी पायपीट करत असतांना अपघात झाला व त्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे.डिझलपायी कुटुंबाने एकमेव असलेला आपला कर्ता व्यक्ती नव्हे आधारच गमावला आहे.
महाराष्ट्रात डिझल पाई शेतकऱ्याचा पहिला बळी,
स्वतःला विश्वगुरु म्हणून घेणारे मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच डिझेल आणायला गेलेल्या आमच्या कर्त्यां माणसाचा बळी गेला अशी संतप्त प्रतिक्रिया कुटुंबाकडून व्यक्त केली जात आहे. आता आम्ही काय करायचं कुणाच्या आधारावर जगायचं असा अक्रोस त्यांच्या पत्नीने व मुलांनी केला .आणि गावातून गावाकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत की, असा एक व्यक्ती दाखवा गावात कोणी रडायचं राहिलं.सर्व गाव गोपीनाथ सरकटे साठी रडलं असेल.
जालना जिल्ह्यातील आमदार बबनराव लोणीकर यांच्या मंठा तालुक्यातील मौजे वझर सरकटे येथील शेतकरी गोपीनाथ सरकटे शेतकऱ्यांच्या परिवारासह गावकरी हवालदिल झाले आहेत. नेत्यांनी तर पाठ फिरवली आहे. आमदार बबनराव लोणीकर तहसीलदार सुमन मोरे, पोलिस निरीक्षक यांनी गावाकडे या सर्व नेत्यांनी गोपीनाथच्या घराकडे पाठ फिरवली असे गावकरी म्हणाले. महाराष्ट्रातील शेतकरी यांना कोण वाली आहे? असे सुद्धा गावकरी म्हणाले.
ह्रदय हेलावून टाकणाराहा क्षण आहे.असेच जर शेतकऱ्यांचे हाल होत असतील तर स्वतःला मायबाप म्हणून घेणारे हे सरकार तरी काय कामाचे. डिझलसाठी अपघातात बळी गेलेल्या स्व.गोपीनाथ सरकटे यांना सरकार ने मदतीचा आधार देण्याची उत्सुकता आहे. हे प्रकरण शासनाने गांभीर्याने घेण्याची अपेक्षा आहे.
स्व. गोपीनाथ सरकटे यांच्या कुटुंबाला आधार म्हणून सरकारने आर्थिक स्वरूपात फुल ना फुलांची पाकळी द्यावी.

Post a Comment
0 Comments