Type Here to Get Search Results !

समृद्धी महामार्गावर रंगले ‘सात मिनिटांचे ' गुपित ! मुख्यमंत्री आणि पोलीस अधीक्षकांच्या 'त्या' भेटीने बुलढाण्यात सस्पेन्स वाढला,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक :

नवराष्ट्र मराठी

बुलढाणा: दि. २३ मे रोजी जिल्ह्याच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात एका वेगळ्याच 'हायवे ड्रामा'ची चर्चा रंगली. निमित्त होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अचानक थांबलेल्या ताफ्याचे आणि त्यानंतर समृद्धी महामार्गाच्या कडेला रंगलेल्या एका गुप्त बैठकीचे! मुख्यमंत्र्यांचा स्पीड आणि महामार्गाचा वेग दोन्ही थक्क करणारे असतानाच, बुलढाणा जिल्ह्यात या प्रवासाला एक रंजक वळण मिळाले.




शिर्डी एमआयडीसीमध्ये निंबे उद्योग समूहाच्या तोफगोळा आणि सीएनजी प्रकल्पाचा भव्य उद्घाटन सोहळा आटोपून २३ मे रोजी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाने नागपूरच्या दिशेने सुसाट निघाला. व्हीआयपी ताफा म्हटला की कडेकोट सुरक्षा आलीच! मुख्यमंत्री बुलढाणा जिल्ह्यातून जाणार असल्याने पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी जिल्ह्याच्या हद्दीपासून ते थेट वाशिम जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत पोलिसांचा तगड़ा फौजफाटा तैनात केला होता. दस्तुरखुद्द तांबे स्वतः या बंदोबस्तावर बारीक लक्ष ठेवून होते. ताफा हायवेवरून जात असताना अचानक एका ठिकाणी थांबला. एरवी सेकंदाचाही खोळंबा न होऊ देणारा मुख्यमंत्र्यांचा ताफा तब्बल ७ मिनिटांसाठी एका जागी थांबल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.


गाडी थांबताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस अधीक्षक नीलेश तांबे गाडीतून उतरले. सुरक्षारक्षक, कमांडो आणि इतर अधिकाऱ्यांना काही पावले दूर राहण्याचा इशारा करण्यात आला. समृद्धी महामार्गाच्या कडेला या दोन मातब्बरांमध्ये तब्बल सात मिनिटे अत्यंत गोपनीय चर्चा झाली. दोघांच्याही चेहऱ्यावरील हावभाव आणि देहबोलीवरून ही केवळ 'औपचारिक भेट' नव्हती, हे स्पष्ट जाणवत होते. या सात मिनिटांत नक्की काय बोलणे झाले ?, जिल्ह्यातील गुन्हेगारीवर चर्चा झाली? की आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काही विशेष 'फिल्डिंग' लावली गेली? की बदल्यांच्या बाजारात साहेबांच्या खुर्चीला 'अभय' मिळाले?, यावरून सध्या संपूर्ण जिल्हा पोलीस दलात 'सीआयडी' लेव्हलचे तर्कवितर्क लावले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून एसपी तांबे यांच्या बदलीच्या वावड्या सातत्याने उठत आहेत. 'साहेबांची बदली फिक्स आहे', 'ते मोठ्या ट्रेनिंगला जाणार आहेत', तर कधी 'त्यांनी स्वतःच बदलीचा अर्ज दिला आहे', अशा गप्पा पोलीस वर्तुळात रंगत असतानाच, थेट मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही सात मिनिटांची 'स्पेशल ट्रीटमेंट' बरंच काही सांगून जात असल्याचा दावा जाणकार करत आहेत.


'वर्धा कनेक्शन' आणि डीजीपींना थेट फोन!

समृद्धी महामार्गावरील या सात मिनिटांच्या भेटीला एक रंजक 'फ्लॅशबॅक' जोडला जात आहे. काही दिवसांपूर्वी वर्धा येथे मेघे यांच्या निवासस्थानी तेरवीच्या कार्यक्रमात एसपी तांबे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची एक भेट झाली होती. या भेटीत एसपी तांबे यांनी मुख्यमंत्र्यांकडे, बुलढाणा कार्यकाळ पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर फडणवीसांनीही तत्परता दाखवत तिथूनच थेट पोलीस महासंचालकांना फोन फिरवला होता, अशी खमंग चर्चा देखील या भेटीमुळे पुन्हा एकदा पोलीस वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे वर्ध्यात सुरू झालेली ही 'स्टोरी' समृद्धी महामार्गावरच्या सात मिनिटांत कोणत्या वळणावर पोहोचली, याकडे आता सर्वांचे डोळे लागले आहेत!


पोलीस दलात 'गुणाकार भागाकार' सुरू!

मुख्यमंत्री फडणवीस तर नागपूरला पोहोचले आणि आपल्या पुढच्या दौऱ्यात व्यस्त झाले. मात्र, समृद्धी महामार्गाच्या थांब्यावर ते जे 'सात मिनिटांचे' सस्पेन्सचे तोफगोळे सोडून गेले आहेत, त्याने बुलढाणा पोलीस दलातील अनेकांची झोप उडवली आहे. यामध्ये भ्रष्टाचारांनी लथपथलेल्या अधिकाऱ्यांचा भरना मोठा आहे, हे तेवढेच खरे! आता साहेबांची गच्छंती होणार की त्यांना बुलढाण्यातच 'मुदतवाढ मिळणार, याचे उत्तर येणारा काळच देईल. पण सध्या तरी या हायवेवरील चर्चेने जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वातावरण चांगलंच तापवलं आहे!

Post a Comment

0 Comments

Top Post Ad