पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ दिलीप वानखेडे (वय २६, रा. हराळ) हे आपल्या शेतात हळद शिजवण्याचे काम करत होते. त्यांच्याकडे हळद शिजविण्याचे कुकर असून ते नियमित कामात व्यस्त असताना गावातील बाजीराव सारंगधर सरकटे हे तेथे आले.
सुरुवातीला बोलाचाली झाली, मात्र दुपारी पुन्हा आलेल्या आरोपीने “तु मला फिरून बोलतो का? तु लय माजला का?” असे म्हणत संताप व्यक्त केला. या वादातून अचानक परिस्थिती चिघळली आणि आरोपीने हातातील लोखंडी दातड्याने सौरभ यांच्या मांडीवर जोरदार वार केला.
या हल्ल्यात सौरभ वानखेडे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या मारहाण प्रकरणी रिसोड पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ग्रामीण भागातील गुन्हे वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आंतरराष्ट्रीय,
महाराष्ट्र,
क्राईम,
खेळ
पत्रकासंघ,

Post a Comment
0 Comments