आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठी न्यूज नेटवर्क,
उन्हामध्ये पत्र्याच्या झळा, झोळीत झोपलेली चिमुकली उठलीच नाही
मुख्यसंपादक -
लातूर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून, तापमानाने ४२ अंशांचा टप्पा ओलांडला आहे. या वाढत्या उकाड्यामुळे जिल्ह्यात उष्माघाताचा दुसरा बळी गेला आहे. औराद शहाजानी येथील ६० वर्षीय वृद्धाच्या मृत्यूनंतर आता औसा तालुक्यातील गोंद्री येथे अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकलीचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिया नेताजी गोरे (मूळ रा. तुपडी, ता. निलंगा) असे या मूत बाळाचे नाव आहे.
सियाची आई तिला घेऊन माहेरी गोद्री येथे आली होती. हे घर कमी उंचीचे आणि पत्र्याचे असल्याने घरात प्रचंड उकाडा होता. त्यातच पत्र्याला बांधलेल्या पाळण्यात झोपलेल्या सियाला वाढलेल्या तापमानाची आणि पत्र्याच्या झळांची तीव्र झळ बसली. तिची हालचाल मंदावल्याचे आईच्या लक्षात येताच तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, शनिवारी दुपारी उपचारादरम्यान सियाचा मृत्यू झाला. यापूर्वी औराद शहाजानी येथील लक्ष्मण दादाराव भंडारे (वय ६०) यांचाही उष्माघाताने मृत्यू झाला होता.
जिल्ह्यात १० एप्रिलपासून तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे.
औसा तालुक्यातील गोंद्रीत ९ महिन्याच्या बाळाचा मृत्यू
पुढे काय? पुढील आठ दिवस उष्णता कायम
मागील आठवड्यातही तापमानाने ३९ ते ४० अंशांचा सरासरी टप्पा गाठला होता. त्यामुळे लातूरकरांना पुढील ७ दिवस दिलासा मिळण्याची शक्यता नाही. उष्णतेच्या लाटेत लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेतमजुरांना सर्वाधिक धोका असतो.. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो दुपारी १२ ते ४ या
जिल्ह्याच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली वाढत्या तापमानामुळे लातूर जिल्ह्यात आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच औराद शहाजानी येथील लक्ष्मण दादाराव भंडारे (क्य ६०) यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला होता. आता ९ महिन्यांच्या सियाच्या मृत्यूने हा जिल्ह्यातील उष्माघाताचा दुसरा बळी ठरला आहे. अवघ्या दहा दिवसांत दोन मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
उष्णतेचा आणि झळांचा तीव्र फटका सिया गोरे ही ९ महिन्यांची चिमुकली आईसोबत माहेरी गोडी (ता. औसा) येथे आली होती. माहेरचे घर कमी उंचीच्या पत्र्याचे असल्याने तिथे प्रचंड उष्णता होती. पत्र्याला बांधलेल्या पाळण्यात झोपलेल्या बाळाला या उष्णतेचा आणि झळांचा तीव्र फटका बसला. तिची हालचाल मंदावल्याने तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
वेळेत उन्हात बाहेर पडणे टाळावे. दिवसभरात भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ प्यावेत. कडक उन्हात दीर्घकाळ काम करणे टाळावे. प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, आजारी व्यक्तींची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
ऊन पावसाचा खेळ राज्यात आणि महाराष्ट्राच्या काही भागात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. यामुळे अरबी समुद्राकडून मोठ्या प्रमाणावर बाष्प येत आहे. वाढत्या उष्णतेमुळे जमिनीलगतची गरम हवावर जाते आणि त्याचवेळी बाष्पयुक्त हवा खाली येते. या हवेच्या मिश्रणामुळे मागील दोन आठवडे 'ढगाळ वातावरण आणि कडक ऊन' असा खेळ सुरू आहे. हाच उकाडा अधिक जीवघेणा ठरत आहे.
Post a Comment
0 Comments