Type Here to Get Search Results !

आष्टी तालुक्यात भेसळयुक्त दुधाचा काळाबाजार? शेकडो लिटर दुधामागील धक्कादायक वास्तव चर्चेत,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


पोलीस,


क्राईम 


खेळ,


नवराष्ट्र मराठी,



www.navrashtramarathinews.in.net


मुख्यसंपादक :


बीड : आष्टी तालुक्यात सध्या दूध संकलनाच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित भेसळीच्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अनेक ठिकाणी जनावरे नसतानाही संकलन केंद्रांवर दररोज मोठ्या प्रमाणात दूध जमा होत असल्याने या संपूर्ण व्यवहाराबाबत संशय निर्माण झाला आहे.स्थानिक पातळीवर होत असलेल्या चर्चेनुसार, काही दूध संकलन केंद्रांवर शुद्ध दुधाऐवजी भेसळयुक्त दूध जमा केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. या दुधामध्ये विविध रसायने, युरिया, डिटर्जंट पावडर आणि पाण्याचा वापर करून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.





विशेष म्हणजे, अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर काही संकलन केंद्रांवरील दुधाची आवक अचानक कमी होत असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी संकलन केंद्रांच्या नोंदी, दूध आवक आणि नमुना तपासणी अहवालांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत गंभीर विषय असल्याने प्रशासनाने आधुनिक यंत्रणांच्या सहाय्याने जागेवरच दुधाची तपासणी करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी देखील पुढे येत आहे.


दरम्यान, या सर्व आरोपांबाबत अधिकृत चौकशी आणि प्रयोगशाळा अहवालांनंतरच वास्तव स्पष्ट होणार असून संबंधित विभागाकडून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आमचे भूम आणि वाशी मध्ये कसल्याही प्रकारची भेसळ नाही तरी दुधाला भाव नाही. ही भेसळ बंद झाली तरच सर्व महाराष्टातील शेतकरी यांना योग्य भाव मिळेल आणि शेतकरी आत्महत्या करणार नाही.भेसळ करणाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad