आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
पोलीस,
क्राईम
खेळ,
नवराष्ट्र मराठी,
www.navrashtramarathinews.in.net
मुख्यसंपादक :
बीड: माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीपात्रात भाविकांनी भरलेली बोट उलटल्याने दोन महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जणांना स्थानिक नागरिक व बचाव पथकाच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अधिक मासानिमित्त पुरुषोत्तमपुरी येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. बुधवारी सकाळी नदीपात्रातून भाविकांना घेऊन जाणारी बोट क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरल्याने अचानक असंतुलित झाली आणि पाण्यात उलटली. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. उपस्थित नागरिकांनी तत्काळ नदीत उड्या मारून अनेक भाविकांना बाहेर काढले.
बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेदरम्यान गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याने घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे.
या दुर्घटनेत सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील बिबी येथील रहिवासी सौ. प्रमिला शेषराव राठोड (वय ५५ वर्षे) व सौ. कांताबाई ज्ञानोबा आंधळे (वय ६० वर्षे) यांचे दुःखद निधन झाले. या अपघातात इतर काही भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर माजलगाव येथील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
( प्रमिलाबाई राठोड व कांताबाई आंधळे)
गोदावरी नदी पात्रात भाविकांची बोट उलटली!
जालना जिल्ह्यातून बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तम पुरी येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची बोट गोदावरी नदीपात्रात उलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परतुर तालुक्यातील गोळेगाव जवळ हा अपघात झाला.
प्राथमिक माहितीनुसार, बोटीत क्षमतेपेक्षा जास्त लोक बसवल्यामुळे हा अपघात घडल्याचे समजते आहे. स्थानिक तरुणांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे काही भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, तर उर्वरित भाविकांचा शोध अजूनही सुरू आहे.
ईश्वर दिवंगत आत्म्यांना चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना.


Post a Comment
0 Comments