Type Here to Get Search Results !

आगामी खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी घेतली कृषिमंत्रायांची भेट,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक :

मुंबई :- आगामी खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना डीएपी व युरिया खतांचा आवश्यक आणि निर्धारित दरात पुरवठा व्हावा, तसेच खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळाबाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसंदर्भात मी मंगळवार दि. २६ मे २०२६ रोजी मुंबई येथे राज्याचे कृषीमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन निवेदन सादर केले.




या निवेदनाची तात्काळ दखल घेत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक व संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कारवाई करण्याचे लेखी निर्देश दिले आहेत.


यावेळी कृषीमंत्र्यांशी चर्चा करताना मी त्यांना सांगितले की, खामगाव व शेगाव तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यातील अनेक कृषी केंद्र चालकांनी मोठ्या प्रमाणात डीएपी आणि युरिया खतांचा साठा करून ठेवला आहे. शेतकऱ्यांनी खतांची मागणी केल्यानंतर त्यांना खत उपलब्ध करून दिले जात नसून, काही ठिकाणी डीएपी किंवा युरिया घेण्यासाठी इतर खतांची जबरदस्तीने लिंकिंग केली जात आहे.


तसेच काही कृषी केंद्र चालकांकडून सध्या १३५० रुपये कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) असलेली डीएपीची गोणी तब्बल १७५० रुपयांना विकली जात असून, २६६ रुपये किंमतीची युरियाची गोणी ३५० रुपयांपर्यंत विक्री केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचे मी कृषीमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.


शेतकरी हिताचे सरकार म्हणून कृषी विभागाने या गंभीर प्रकाराला वेळीच आळा घालावा, कृत्रिम साठेबाजी थांबवावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी मी निवेदनाद्वारे केली.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad