आंतरराष्ट्रीय,
राष्ट्रीय,
महाराष्ट्र,
राजकीय,
खेळ,
क्राईम,
नवराष्ट्र मराठी न्यूज,
www.navrashtramarathi.in.net
मुख्यसंपादक :
अपूर्ण कामे, संथगती, निकृष्ट दर्जा आणि गैरव्यवहाराच्या चर्चांमुळे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेचा लोणार तालुक्यात अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचवण्याचा उद्देश असलेल्या या योजनेसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला. अनेक गावांमध्ये मोठ्या गाजावाजात कामांना सुरुवात झाली; मात्र प्रत्यक्षात आजही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने संतापाची लाट उसळली आहे.
काही गावांत तर सिमेंट रस्ते उखडून टाकली मात्र अजून त्या रस्त्यांची दुरुस्ती नाही ना नवीन रस्ते झाले. पावसाळा तोंडावर आला गावातील रस्ते खराब आहेत धड मोटारसायकल चालवता येत नाही. काही गावात जुन्याच पाईपलाईनचा वापर करण्यात आला मात्र जलजीवन चे नाव करण्यात आले. बिले काढण्यात आली. काय या योजनेमध्ये पुढारी, नेते, अधिकारी यांचे ठेकादाराशी सगनमत आहे?
जलजीवन मिशन, मिशन मात्र वाऱ्यावर,
जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत एकूण ३७ योजनांचा समावेश करण्यात आला आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार १२ योजनांनी १००% भौतिक प्रगती गाठल्याचा दावा केला जात आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी केवळ ६ योजना ग्रामपंचायतींकडे देखभाल व दुरुस्तीसाठी हस्तांतरित करण्यात येणार होते मात्र प्रत्यक्ष्यात योजनांमध्ये अजूनही ‘ट्रायल अँड रन’ सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे उर्वरित २५ योजना अजूनही विविध टप्प्यांमध्ये रखडलेल्या अवस्थेत आहेत.कोणत्याच योजनाचामेल नाही.निधीमात्र हडप.
कामे अर्धवट सोडण्यात आली, याला नाही कोणी वाली,
उन्हाळ्याच्या झळांनी जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीर झाली असताना अनेक गावांतील महिलांना अजूनही हंडाभर पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. जलजीवन मिशनमुळे घराघरांत नळाद्वारे पाणी येईल, अशी आशा ग्रामस्थांना होती. मात्र, प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये जलवाहिनी टाकून काम अर्धवट सोडण्यात आले आहे. काही ठिकाणी जलकुंभांची कामे रखडली आहेत, तर अनेक गावांमध्ये रस्ते खोदून तसेच सोडल्याने नागरिकांना वाहतुकीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नित्कृष्ट दर्जाचे काम मात्र अपूर्णच,
ग्रामस्थांच्या आरोपानुसार अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असून, कामे अत्यंत हलगर्जीपणे करण्यात आली आहेत. काही गावांमध्ये जलवाहिनी अत्यंत कमी खोलीत टाकण्यात आल्याने भविष्यात गळती आणि पाईप फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाकडून प्रभावी देखरेख होत नसल्याने ठेकेदारांकडून मनमानी पद्धतीने कामे सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहे
उच्च स्थरीय चौकशी करावी,
जिल्ह्यातील काही गावांमध्ये सरपंच किंवा स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संबंधित व्यक्तींनाच ठेके देण्यात आल्याची चर्चा रंगली असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही नागरिकांना पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत संपूर्ण कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अपूर्ण कामे मार्गी लावावीत,
दरम्यान, प्रशासनाकडून वारंवार कामे अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये परिस्थिती जैसे थेच आहे. पुरेशा निधी अभावी काही कामे रखडल्याचेही बोलले जात आहे. पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देऊन अपूर्ण कामे मार्गी लावावीत, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
मुख्यसंपादक: देविदास वायाळ पाटील,

Post a Comment
0 Comments