Type Here to Get Search Results !

गिऱ्यारोहकाचा ऍव्हरेस्टवर दुर्दैवी अंत, तब्बल ९० लक्ष खर्च असल्यामुळे मृतदेह तिथेच सोडण्याचा कुटुंबाचा निर्णय,,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठी न्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक :

एव्हरेस्टवर शिखर चढण्याचं स्वप्न पूर्ण झालं… पण परतीचा प्रवास कधीच झाला नाही ! ५३ वर्षीय गिर्यारोहकाचा दुर्दैवी अंत, कुटुंबाचा हृदय पिळवटून टाकणारा निर्णय “एव्हरेस्ट सर करायचंच…” हे स्वप्न डोळ्यांत साठवून हैदराबादचे ५३ वर्षीय गिर्यारोहक अरुण कुमार तिवारी मृत्यूशी झुंज देत अखेर जगातील सर्वोच्च शिखरावर पोहोचले. पण नियतीने त्यांच्यासाठी वेगळंच काही लिहून ठेवलं होतं. शिखर सर केल्यानंतर परतीच्या प्रवासातच त्यांचा मृत्यू झाला आणि आता त्यांचा मृतदेह कायमचा एव्हरेस्टवरच राहणार आहे.


या घटनेने संपूर्ण गिर्यारोहण विश्व हादरले आहे. त्याहून वेदनादायी म्हणजे, तब्बल ९० लाख रुपयांचा खर्च आणि “डेथ झोन” मधील जीवघेणा धोका लक्षात घेऊन कुटुंबीयांनी त्यांचे पार्थिव खाली न आणण्याचा कठीण निर्णय घेतला आहे.


मृतदेह खाली आणण्यासाठी तब्बल १ कोटींचा खर्च !

पायोनियर ॲडव्हेंचर या मोहिमेचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेने सुरुवातीला मृतदेह खाली आणण्यासाठी सुमारे १.१ कोटी रुपयांचा खर्च सांगितला होता. नंतर तो कमी करून जवळपास ९० लाखांवर आणण्यात आला. मात्र एवढी रक्कम उभारणे आणि त्यासाठी इतरांचे प्राण धोक्यात घालणे कुटुंबीयांना योग्य वाटले नाही.


संस्थेचे प्रमुख निवेश कार्की यांनी सांगितले की, एव्हरेस्ट मोहिमेचा साधारण खर्चच ४० ते ४५ लाख रुपये असतो. पण ८ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवरून मृतदेह खाली आणणे हे अत्यंत धोकादायक आणि दुप्पट खर्चिक काम असते.



शेर्पांनी दिला होता माघारी फिरण्याचा सल्ला,

कॅम्प ४ वरून अंतिम चढाई सुरू झाल्यानंतर अरुण तिवारी यांना तीव्र थकवा जाणवत होता. त्यांच्या सोबत असलेल्या शेर्पाने त्यांना अनेकदा माघारी फिरण्याचा सल्ला दिला. मात्र एवढ्या जवळ आलेलं स्वप्न सोडायला ते तयार नव्हते.जिद्दीच्या जोरावर त्यांनी अखेर एव्हरेस्ट सर केला. पण खाली उतरताना हिलरी स्टेपजवळ अचानक त्यांची प्रकृती बिघडली. प्राणवायूच्या कमतरतेमुळे त्यांना रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. शेर्पांनी त्यांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, अतिरिक्त ऑक्सिजनही दिला… पण मृत्यूने तिथेच त्यांना गाठलं.


एव्हरेस्टचा ‘डेथ झोन’ किती भयानक आहे ?

हिलरी स्टेप हे ठिकाण समुद्रसपाटीपासून जवळपास ८,७९० मीटर उंचीवर आहे. येथे ऑक्सिजन अत्यंत कमी असतो आणि प्रत्येक श्वासासाठी शरीराला संघर्ष करावा लागतो. हेलिकॉप्टरही फक्त कॅम्प २ पर्यंतच जाऊ शकते. त्यामुळे उरलेला हजारो मीटरचा जीवघेणा प्रवास शेर्पांनाच करावा लागतो.सध्या त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली असून मृतदेह शोधणेही कठीण बनले आहे. हिमस्खलन, वादळे आणि गोठवणारी थंडी यामुळे मृतदेह खाली आणणे म्हणजे आणखी काही लोकांचे जीव धोक्यात घालण्यासारखे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.


एक स्वप्न पूर्ण झालं… पण कायमचं थांबलं

अरुण तिवारी यांनी अखेर एव्हरेस्ट सर केलं… पण त्या शिखरावरून ते पुन्हा कधीच परत आले नाहीत. त्यांच्या जिद्दीला आणि धाडसाला सलाम करत अनेक गिर्यारोहकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad