Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी 'लेडी सुपरकॉप' डॉ. मीरा बोरवणकर!

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक -

मुंबई  - महिला आयोग अध्यक्षपदावर माजी IPS मीरा बोरवणकर यांची नियुक्ती.महाराष्ट्र सरकारने राज्य महिला आयोगाच्या नूतन अध्यक्ष म्हणून राज्याच्या पहिल्या महिला IPS अधिकारी डॉ. मीरा बोरवणकर यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष पद रिक्त होते. आता या पदावर माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी नियुक्ती झाली असल्याची चर्चा आहे.


महिलाआयोगावर सिंघम लेडी,

राज्यात एकीकडे महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असताना हे पद सध्या रिक्त होते. या पदावरील रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदावर अजूनही कोणाची नियुक्ती केलेली नव्हती. त्यातच आता या पदावर माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या नावावर मोहर लागली आहे. राज्य महिला आयोगावर सिंघम, तडफदार आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर आल्या आहे. सर्वांचे लक्ष लागलेले हे पद आता रिक्त नसणार आहे.


रुपाली चाकणकर यांचा झाला होता राजीनामा,

राज्य महिला आयोगाच्या पदावर माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची नियुक्त होणार अशी चर्चा असतानाच मीरा बोरवणकर या कर्तव्यदक्ष आणि तडफदार महिला आयपीएस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांची या महत्वाच्या पदावर नियुक्त झाली आहे.अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य महिला आयोगाचे पद गेले अनेक दिवस रिक्त होते. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी नुकताच महिला आयोगाच्या पदावरुन राजीनामा दिला आहे. भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबत रुपाली चाकणकर यांचा फोटो आल्यानंतर त्यांनी या प्रकरणात राजीनामा दिला होता.


अंजली दमानिया यांनी केली होती मागणी,

राज्य महिला आयोगाच्या पदी एखादी माजी आयपीएस अधिकारी नेमण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती. त्यानंतर यावर चर्चा सुरु असतानाच आता माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची या पदावर नियुक्ती केली आहे. 


पुण्याच्या पोलीस आयुक्त म्हणूनही केले होते काम,

मीरा बोरवणकर यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्त म्हणूनही काम केले होते. त्यांनी मुंबई क्राईम ब्रँचचे नेतृत्वही केले होते. त्यांनी अलिकडेच ‘मॅडम कमिशनर’ नावाचे आत्मकथनपर पुस्तक लिहीले होते. 


महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी 'लेडी सुपरकॉप' 



डॉ. मीरा बोरवणकर! 


त्यांच्या निवडीमुळे महिला आयोगाला एक अनुभवी आणि कणखर नेतृत्व मिळाले आहे.

 आयोगाबद्दल महत्त्वाची माहिती: स्थापना: २५ जानेवारी १९९३ (भारतातील पहिले राज्य महिला आयोग)

मुख्यालय: मुंबई

ब्रीदवाक्य: स्त्रीशक्तीरतुल्य सदा

कार्य: महिला हिंसाचार निर्मूलन आणि महिलांच्या स्थितीत सुधारणा करणे.

अधिकार: दिवाणी न्यायालयाचे अधिकार.

 डॉ. मीरा बोरवणकर यांचा प्रेरणादायी प्रवास:

महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला IPS अधिकारी (१९८१ बॅच).

पुस्तके: 'मॅडम कमिशनर' आणि 'लीव्हज ऑफ लाईफ'.

गुन्हेगारी विश्वात जरब बसवणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

नूतन अध्यक्षा डॉ. मीरा बोरवणकर यांना पुढील यशस्वी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

Post a Comment

0 Comments