Type Here to Get Search Results !

एक कॉल आणि जंगली जाणवरांच्या पाण्याचा प्रश्न सॉल,

आंतरराष्ट्रीय,


राष्ट्रीय,


महाराष्ट्र,


राजकीय,


खेळ,


क्राईम,


नवराष्ट्र मराठीन्यूज,


www.navrashtramarathi.in.net


मुख्यसंपादक -

 मुंबई : चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान तब्बल 46°C च्या वर पोहोचले आहे. अशा भीषण उष्णतेमध्ये ताडोबा परिसरातील वन्यप्राणी पाण्यासाठी भटकत आहेत. अशा परिस्थितीत मनसे संस्थापक अध्यक्ष Raj Thackeray यांनी चंद्रपूर मनसे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांना फोन करून ताडोबातील वन्यप्राण्यांसाठी तात्काळ पाण्याचे टाके व पाणवठे उभारण्याच्या सूचना दिल्या, ही खऱ्या अर्थाने माणुसकी आणि निसर्गप्रेमाची जाणीव करून देणारी बाब आहे. 




राजसाहेब ठाकरे हे फक्त महाराष्ट्राच्या प्रश्नांवर आवाज उठवत नाहीत, तर मुक्या जीवांच्या वेदनाही समजून घेतात, हे पुन्हा एकदा दिसून आले. चंद्रपूर मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांनी राजसाहेब यांचे आदेश मिळताच ताडोबातील वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जंगल भागात खड्डे खोदले. खोदलेल्या खड्ड्यात सिमेंट काँक्रिट केले व त्यावर प्लास्टिक टाकून टॅंकरने पाणी भरले. जंगलात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे पाणवठे वन्यप्राण्यांसाठी जिवनदायी ठरले आहे. या उपक्रमाचे वनविभागासह पर्यावरण प्रेमींनी कौतुक केले असून राजसाहेब ठाकरे यांचे यांचे आभार मानले आहे. मनसेच्या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी घेतलेल्या आवश्यक सामाजिक उपक्रमांचे सर्वत्र प्रशंसा केली जात आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad