Type Here to Get Search Results !

युद्धापेक्षा डेंजर! भारतावर घोंघावत आहेत 3 मोठी संकटे; गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वाना धोका

आंतरराष्ट्रीय-

महाराष्ट्र -

क्राईम -

पत्रकार संघ -

मुख्यसंपादक - देविदास वायाळ पाटील



 भारतावर 3 मोठी संकटे घोंघावत आहेत. ही संकटे दूर करण्यासाठी वेळीच उपाययोजना न केल्यास याचा गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत लाखो लोकांवर गंभीर परिणाम होऊ शकतो असा इशारा संशोधकांनी दिला आहे

इराण आणि अमेरिका इस्त्रायल यांच्या युद्धामुळे निर्माण झालेली इंधन टंचाई, चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांकडून सतत असणारा युद्धाचा धोका यासह भारतासमोर अनेक धोको आहेत. अशातच या धोक्याव्यतिरिक्त भारतावर 3 मोठी संकटे घोंघवत आहेत. हे धोके इतके डेंजर आहेत की गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत लाखो लोकांवर होणार याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. हा धोका पिण्याच्या पाण्याशी संबंधित आहे. भारताच्या गोड्या पाण्याचा सर्वात मोठा स्रोत धोक्यात आहे. जर या गंभीर समस्येकडे लक्ष दिले नाही आणि वेळेवर आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत, तर याचे विनाशकारी परिणाम होऊ शकतात अशी भिती व्यक्त केली जात आहे.

भारतातील बहुतेक नद्यांचे उगमस्थान हिमालयात आहे. देशाचा प्रमुख जलस्त्रोत असलेल्या हिमनद्या वेगाने वितळत आहेत. तर, दुसरीकडे मान्सूनचा पॅटर्न देखील बदल आहे. भारतीय शेती मान्सूनवर अवलंबून आहे. मान्सूनचे स्वरूप बदलत असल्याने याचा थेट परिणाम शेतीवर झाला आहे. भविष्यात अनेक पिके यामुळे नष्ट होऊ शकतात. पाण्याची गरज भागवण्यासाठी भूजलाचा प्रचंड प्रमाणत उपसा केला जात आहे. ही एक मोठी चिंतेची बाब आहे. भारत आता जगातील एकूण भूजलापैकी अंदाजे 25 टक्के जलसाठा वापरतो. शहरांमधील वाढत्या लोकसंख्येच्या घनतेमुळे पिण्याच्या पाण्याचे संकट अधिकच गंभीर होऊ शकते.

डाउन टू अर्थ'ने एका अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार भारत सिंचनासाठी भूजलाच्या गंभीर शोषणाचा सामना करत आहे. जगातील एकूण भूजल उपशात भारताचा वाटा अंदाजे 25 टक्के आहे. पाणीटंचाई असलेल्या भागात न पिकणाऱ्या पिकांच्या, ज्यात भाताचाही समावेश आहे अशा पिकांच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जात असल्याची धक्कादायक माहिती या अहवालात देण्यात आली आहे.

भारताची 30 पेक्षा जास्त लोकसंख्या आधीच शहरांमध्ये राहते. 2030 पर्यंत हा आकडा 40 टक्के पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. भारतीय शहरांमध्ये लोकसंख्या वाढत असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्याही निर्माण झाली आहे. नीती आयोगाच्या मते, सध्या 65 भारतीय शहरांमध्ये मास्टर प्लॅनचा अभाव आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.  

आशियाचे जलस्रोत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळत आहेत. यामुळे 2 अब्जाहून अधिक लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नेपाळमधील 'इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट'ने एक अहवाल प्रसिद्द केला. या अहवालानुसार 2000 सालापासून हिमालयीन प्रदेशातील हिमनद्या दुप्पट वेगाने वितळत आहेत. या हिमनद्या गंगा आणि सिंधू यांसारख्या नद्यांना पाणी पुरवतात, ज्या लाखो लोकांची जीवनरेखा आहेत.

समुद्रसपाटीपासून सुमारे 4,000 मीटर उंचीवर असलेल्या गंगोत्री हिमनदीच्या बर्फाळ मुखातून वाहणारे पाणी सर्वात शुद्ध आहे. हे पाणी इतके शुद्ध आहे की उपखंडात इतरत्र ते क्वचितच आढळते. मात्र, गंगोत्री हिमनदीपासून केवळ 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या गौमुख येथे पोहोचताच पाणी प्रदूषित होऊ लागते. कानपूरसारख्या ठिकाणी गंगेचे पाणी अंघोळीसाठीसुद्धा योग्य नसते. 

देशातील घटत चाललेली जलसंपदा आणि प्रदूषित पाणी हे क्षेपणास्त्र किंवा बॉम्बसारखा मोठा धोका आहे असा इशारा संशोधकांनी दिला आहे. नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे गंभीर कृषी संकट निर्माण होऊ शकते. प्रदूषित पाण्यामुळे असे आजार उद्धवू शकतात ज्यांच्या उपचारांवर आयुष्यभराचा खर्च येऊ शकतो. शास्त्रज्ञांनी या धोक्यांबाबत मोठी चेतावणी दिली आहे. वेळीच या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. अन्यथा भविष्यात भारताला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. याचा थेट परिणाम कोट्यावधी भारतीयांवर होणार आहे.


बातम्यासाठी संपर्क - मो. 9834285153


Web - www.navrashtramarathi.in.     

 


Email netnavrashtramarathinews @gmail.com

Post a Comment

0 Comments